आमच्यासाठी पीएमटी बसच मेट्रो सामान्य पुणेकरांची भावना

बसेस सुधारण्याची पुणेकरांची मागणी

पुणे: निसर्गाचा वारसा जपलेल्या पुणे शहरात एकीकडे पुणे महानगर पालिका प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे  तर दुसरीकडे प्रदुषणास पाठींबा देत आहे. पुण्यातील जास्तीत जास्त पीएमटी बस ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण करतात. महानगर पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असून  पुण्यात मेट्रो येईल म्हणून खुश आहे. दुचाकीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. जीव मुठीत धरून चालक बस चालवत असतात. बसचा आवाजच येवढा असतो की प्रवाशी टिकिट कोणते मांगतो ये सुद्धा वाहकाला ऐकायला येत नाही. पुणेकरांना बस चा प्रवास असुरक्षित वाटू लागला आहे. पण सामान्य नागरिकाला बस शिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे मेट्रो राहूद्या आधी बस सुधारा अशी विनंती पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. तसेच पीएमपीएलच्या  खटारा बस मधून निघणारा धूर पर्यावरणाला हानिकारक आहे. पर्यावरणीय समतोल राखायचा असेल तर प्रदूषण करणाऱ्या बस विषयी निर्णय घेण्याची गरज आहे.

 

काय आहेत पुणेकरांच्या भावना

मेट्रो हे एक मृगजळ आहे. ती येईल तेव्हा येईल. तोपर्यंत आधी पीएमपीची दुरवस्था सुधारणे गरजेचे आहे. कारण मेट्रो आली तरी ती ठराविक मार्गावरच धावणार आहे. मात्र उपनगरे व शहरांतर्गत नागरिकांसाठी पीएमपी हीच आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीच्या सुधारणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे – रविंद्र लाहूडकार, पुणे

पीएमटी व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ आहे.प्रवशांच्या तुलनेत बस खूप कमी आहेत.पुण्यातील रस्त्यावर रोज दोन ते तीन बस बंद पडलेल्या दिसतात. मेट्रो चे स्वागत आहे पण सामान्य नागरिकासाठी पी एम टी बसच मेट्रो समान आहे. त्यामुळे आधी बसची सुधारणा व्हावी-
आशुतोष मसगोंडे, विद्यार्थी पुणे

 

You might also like
Comments
Loading...