fbpx

महाजनांना पुणेरी दणका; आमच्या पाण्याचे नाही, आधी स्वत;च्या मंत्रालयाचे परीक्षण करा!

Not water sharing with Gujrat-Mahajan

पुणे: पुणे शहराला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा पुणे महापालिका जास्त पाणी उचल आहे, प्रतिव्यक्ती दरदिवशी १५५ लिटर पाणी आवश्यक असताना ३३५ लिटर पाणी उचलले जाते. हे सर्व पाहता अतिरिक्त पाणी जाते कुठे ? याचे लेखापरीक्षण करण्याची सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुणे महापालिकेला केली आहे, आता गेली अनेक वर्षे टीका सहन कराव्या लागणाऱ्या पाण्याच्या विषयावरच महाजन यांनी बोट ठेवल आहे, त्यामुळे पुणेरी भाषेत शालजोडे लगावणाऱ्या पुणेकरांनी ‘आमच्या पाण्याचे नाही, आधी स्वत;च्या मंत्रालयाचे परीक्षण करा’ म्हणत महाजन यांचा समाचार घेतला आहे.

पुणेकर जास्त पाणी वापरतात म्हणून कायम ओरड केली जाते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळा आल्यावर आधी शहराच्या पाणी कपातीची चर्चा सुरु होते. कसब्यात लहानाचे ‘मोठे’ झालेले पालकमंत्री गिरीश बापट यांनी देखील उपरोधिकपणे ‘पुणेकर दोन वेळेस आंघोळ करतात’ असे विधान अनेकवेळा केले आहे. आता ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा पुणे महापालिका जास्त पाणी उचल आहे. हे जास्तीचे पाणी जाते कुठे? कोणी चोरी करते का? याच लेखापरीक्षण करण्याची सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

खडकवासला धरणातून शहरासाठी अकरा टीएमसी पाणी देण्याचा नियम आहे. मात्र, पालिकेकडून प्रत्यक्षात साडेसतरा टीएमसी पाणी उचलले जाते. याला कारण पाणी गळती हे देखील आहे. पाणी गळती रोखण्यात येणारे अपयश, मुंढवा जॅकवेलमधून पाणी उचलण्यात असणारी उदासीनता झाकण्यासाठीच पुणेकरांच्या पाण्याचे लेखापरीक्षण करण्याच बोलले जात आहे. त्यामुळे आधी जलसंपदा विभागाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.