सव्वा लाखांची लाच घेताना भूसंपादन अधिकाऱ्याला रंगेहात अटक

dhanaji patil

पुणे: शासनाने संपादीत केलेल्या जागेचे पैसे देण्यासाठी सव्वा लाखांची लाच मागणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धनाजी पाटील असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

हा सर्व प्रकार नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये घडला. भूसंपादन अधिकारी असणारे  धनाजी पाटील यांनी तक्रारदाराकडे सव्वा लाख रुपयांची लाच मागितली होती. या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानुसार आज सायंकाळी पुण्यातील नविन प्रशासकिय इमारतीमध्ये हे पैसे स्वीकारताना पाटीलला रंगेहात पकडण्यात आले आहे.