पुण्यात प्रेमवीर ‘मजनू’चा मुलीच्या हॉस्टेलबाहेर गोळीबार

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात एका प्रेमभंग्या प्रेमवीराने मुलींच्या वसतिगृहाबाहेर हवेत गोळीबार करुन शोबाजीचा प्रयत्न केला. ब्रेकअप झाल्याच्या रागातून या सिरफिऱ्या बेबाक आशिकने थेट मुलीच्या हॉस्टेलबाहेर हवेत गोळ्या झाडल्या. बालेवाडी परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या युवकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

सध्या पुणे आणि अपराध हे समीकरणं बनत चाललं आहे. दररोज विद्यानगरीत खून, मारामारी, चोरी, हत्याकांड अशा घटना समोर येत आहेत. त्यातच लपवाछपवीच्या प्रेमप्रकरणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही अधिक आहे. बालेवाडी परिसरातील गोळीबाराची घटनाही प्रेमप्रकरणातूनच झाली. दरम्यान,  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉस्टेलमधील मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.