भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : बापट

पुणे : भाजपा युतीचा पुण्याचा जाहीरनामा काल पुण्यातील भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आला. पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. भाजपाचा जाहीरनाम्यात विविध आश्वासने दिली आहेत. मेट्राेपासून पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, आराेग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, शिवसेनेच्या उपनेत्या निलम गाेऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, आरपीआयचे शहराध्यक्ष अशाेक कांबळे, महापाैर मुक्ता टिळक, उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे,रिपाई नेते मंदार जोशी,शिवसेनेचे किरण साळी आदी उपस्थित हाेते.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक गोष्टी

  • पुण्याला याेग सिटी बनविणार
  • स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार पुन्हा एकदा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
  • शहरासाठी सांस्कृतिक धाेरण देखील तयार करणार आले आहे.
  • पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा
  • हरित पुणे यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
  • केंद्राच्या ‘सर्वांसाठी घरे’ योजनेची प्रभावी अमलबजावणी करणार
  • नदी सुधारणा प्रकल्पाअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारणार
  • अल्पसंख्याकांच्या योजनांना गती देणार