पुणे : बिग बास्केटचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी; धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक

big basket

पुणे – पुण्यातील बावधन बुद्रूक भागातील बिग बास्केटच्या गोडाऊन ला काल रात्री उशिरा आग लागली यामध्ये धान्य , भाजीपाला आणि इतर किराणा समान जाळून खाक झालं . पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांद्वारे ही आग विझवण्यात आली . यामध्ये कोणीही जखमी नाही.

रात्रीच्यावेळी आग लागल्याने गोडाऊनमध्ये फार लोक नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र या आगीत गोदामातील धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण १२ फायर इंजिन्सच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणाऱ्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे १२ ते १३ शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली. गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली.

महत्वाच्या बातम्या :