गणेशोत्सवाच्या वादाची मालिका सुरूच ; महापालिकेचा सन्मान न स्वीकारताच भाऊ रंगारी गणपती विसर्जित

पुणे : यंदाच्या शतकोत्तर रौप्य मोहत्स्वला किनार होती सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात कोणी केली या वादाची हा वाद अखेरच्या दिवशी सुधा पहायला मिळायला. कारण भाऊसाहेब रंगारी मंडळाने आज महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास नकार दिला.

भाऊसाहेब रंगारी मंडळ पहाटे साडे चारच्या सुमारास टिळक चौकात आले. त्यांनी तासभर त्यांच्या पथकाने वादन केले. त्यानंतर महापौरांच्या हस्ते सत्कार स्विकारण्यास बोलावले असता त्यांनी मंडळाचा गणेश रथ तसाच पुढे नेला. सन्मानासाठी महापालिकेकडून त्यांच्या नावाची घोषणा केली जात असतानाही मंडळाचे कार्यकर्ते पुढे निघून गेले. भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशत्सवाचे जनक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून वाद सुरू आहे.