ठाणे क्राईम ब्रँचकडून पुण्यातील पेट्रोल पंप ‘सील’

ठाणे क्राईम ब्रँचकडून पुण्यात कारवाई मात्र पुणे पोलिसांना माहितच नाही

पुणे: हडपसर भागातील वैदूवाडी येथे असणारा पेट्रोल पंप ठाणे क्राईम ब्रँचकडून सील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलिसांनी पुण्यामध्ये येऊन केलेल्या कारवाईची पुणे पोलिसांना माहिती देखील नाही.

पेट्रोल पंपावर मशीनमध्ये चिप बसवून केल्या जाणाऱ्या पेट्रोलमधील गडबडी विरोधात ठाणे क्राईम ब्रँचकडून गेल्या दिवसांपासून धडक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील काही पेट्रोल पंपांवर देखील काही महिन्यांपूर्वी चेकिंग करण्यात आली होती. दरम्यान काल ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने वैदूवाडीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या विद्या पेट्रोल पंपावर कारवाई करत तो सील केला आहे. तर या कंपनी मालक असणारे दीपक गुप्ता हे कुठे आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही.

दीपक गुप्ता हे पेट्रोल आणि डीलर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आहेत. दरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे शहरातील चोरी बहाद्दर पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत.

You might also like
Comments
Loading...