कौतुक तर होणारच ! पुण्यातील ‘अरिष्टी’ या स्टार्टअपचं राष्ट्रीय स्तरावर यश

arishti

पुणे : गेल्या ५-६ वर्षात देशातील तरुणाईला फक्त नोकरदार म्हणून नाही तर नोकऱ्या पुरवणारे स्वावलंबी उद्योजक होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉ. अब्दुल कलाम सर यांच्या व्हिजनमधील भारत बनवण्यासाठी तरुणाईची ईच्छाशक्ती व पुढाकार अमूल्य आहे.

त्यामुळेच, भारताला स्वयंसिद्ध आणि महासत्ता बनवण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारने देखील पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ ‘मेक इन महाराष्ट्र’ ची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेमुळे नवनव्या कंपन्या उभारण्यासोबतच रोजगार उपलब्ध करण्याचा हेतू देखील होता. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पात देखील मध्यम व लघु उद्योगांसाठी खास आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने आयटी क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पुढाकारातून सरकारी विभागातील, जनतेशी निगडित असलेल्या प्रश्नांना नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सुकर पद्धतीने सोडवण्यासाठी हॅकॅथॉन सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यास सुरुवात केली होती. या उपक्रमाला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनि देखील चांगला प्रतिसाद देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

अशाच एका युवकांच्या पुढाकाराने पुण्यातील सीओईपी कॅम्पसमधील भाऊ (BHAU) इन्स्टिट्यूटमधील स्टार्टअप अरिष्टी सायबरटेक या कंपनीने ५G हॅकॅथॉन या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. अरिष्टी सायबरटेक ही एक सायबर सेक्यूरिटी स्टार्टअप आहे.

स्पर्धेबद्दल माहिती –

नुकत्याच संचार मंत्रालय, भारत सरकार आयोजित ५ जी हॅकॅथॉन या राष्ट्रीय स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून जवळपास १०२४ स्टार्टअप्स पैकी १०० स्टार्टअप्स ची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे ३ टप्पे असणार आहेत. तर, पहिल्या १०० स्टार्टअप्सला १ लाखाचे पारितोषिक देण्यात येणार असून ते पुढच्या टप्प्यांमध्ये ५ जी ट्रायल करणार आहेत, असे संचार मंत्रालयाचे सचिव अंशू प्रकाश यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सांगितले आहे.

काय आहे अरिष्टी सायबरटेक ?

अरिष्टी सायबरटेक हे एक सायबर सेक्यूरिटी स्टार्टअप असून ते कंपन्यांतील संवेदनशील माहितीचे देवाण-घेवाण करण्यासाठी लागणारे प्रॉडक्ट कंपन्यांना प्रदान करत आहेत. ५G तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्रॉडक्ट उत्तम कार्यशील बनू शकते. यासाठी हे पारितोषिक अरिष्टीला देण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच आय आय टी मुंबईच्या इंक्यूबेशन सेंटरला देखील निवड झालेली आहे. या स्टार्टअप अंतर्गत सध्या ते ‘क्वांटम टेकनॉलॉजी’ मध्ये काम करत आहेत, असे कंपनीचे डायरेक्टर कनक कवडीवाले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या