Pune- सुजाता श्रॉफविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पुण्याच्या बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत पाचजणांना चिरडणाऱ्या सुजाता श्रॉफविरोधात अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी पोलिसांनी केवळ निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघातानंतर निघून जाणे या कलमांअतर्गत काल मंगळवारी अटक करण्यात आली होती. काही वेळातच या महिलेला जामीनही मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्य़पद्धतीवर टीका होऊ लागली होती.

[jwplayer Gcqt5a1G]

सुजाता श्रॉफ या महिलेनं सोमवारी बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत रस्ता ओलांडणाऱ्या पाचजणांना चिरडलं होतं. यात मायलेकींचा मृत्यूही झाला होता. दोघांचा मृत्यू होऊनही पोलीस सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल विचारत पोलिसांवर टीका होऊ लागली होती. मात्र आता पोलिसांनी वाढीव कलमांअतर्गत चालक महिलेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

श्रॉफ यांच्यावर जो आधी गुन्हा नोंद आहे, त्या गुन्ह्यामधेच सदोष मनुष्यवधाचं कलम वाढवण्यात आलं आहे.