पुण्यात शिवसृष्टीच्या निधीवरून वाद; महापालिकेच्या शिवसृष्टीला अडथळे, पुरंदरेंना निधीची खैरात

babasaheb purandare and pune corporation

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून कात्रज येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएनपीटी योजने अंतर्गत ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे. एका बाजूला अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आता कुठे महापालिकेच्या शिवसृष्टीला मंजुरी मिळाली आहे, तरीही अडथळ्यांची मालिका सुरूच असताना दुसरीकडे मात्र पुरंदरेंकडून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भरभरून निधी मिळत आहे, त्यामुळे आता शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना आणि इतिहास अभ्यासकांकडून वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून उभारण्यात येणारी शिवसृष्टी खासगी संस्था आहे. त्यामुळे सरकारकडे निधी मागण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे यावर वाद निर्माण करू नये असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले आहे, तर . भाजपने पुणेकरांच्या भावनेशी खेळ थांबवावा. १५ दिवसात निर्णय घेऊ सांगणारे मुख्यमंत्री एक शब्दही उच्चारायला तयार नसल्याच म्हणत विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. कात्रजच्या शिवसृष्टीमध्ये नेमक काय असणार हे माहित नाही, त्यामुळे तिथे काय असणार हे कळायला हव असल्याचही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसृष्टीच्या निधीवरून नवीन वाद निर्माण होणार असल्याच दिसत आहे.

तर दुसरीकडे आम्ही आठ महिन्यांपूर्वी जेएनपीटीच्या अंतर्गत असणाऱ्या सीएसआरच्या माध्यमातून निधीची मागणी केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने निधी देण्याच जाहीर केल्याचं कात्रज येथील शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.