fbpx

पुण्यात चार कोटींची रक्कम घेवून एटीएम व्हॅनचा चालक फरार

cash robbery pune

पुणे: शुक्रवारी रात्री हडपसर परिसरातून एटीएम व्हॅनचा चालक गाडीसह पैसे घेवून पळून गेल्याची घटना घडली. या गाडीमध्ये आयसीआयसीआय बँकेची तब्बल चार कोटींची रक्कम होती. काल रात्री रात्री ९ च्या सुमारास ससाणेनगर येथे हि गाडी एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान चालक चार कोटी रुपये तसेच सुरक्षारक्षकाच्या बंदुकीसह पसार झाला आहे.

हि सर्व घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात केली. मात्र चालकाने सुरक्षेसाठी गाडीत लावण्यात आलेली जीपीएस यंत्रणा बंद करून ठेवलेली आहे. द्दरम्यान रात्री उशीरापर्यंत या गाडीचा तपास लागू शकला नाही. याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.