मुळशीचा नाद खुळा : भात लावणीचा ‘हा’ नवा मुळशी पॅटर्न

टीम महाराष्ट्र देशा : पुणे जिल्ह्यातील मावळ-मुळशी खोऱ्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने भातलावणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. विशेष म्हणजे ही भातलावणी खास आधुनिक दोरी पद्धतीने केली जाते.

पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तब्बल ७०% जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुळशी खोर हिरवेगार झाले आहे. भाताची खासरही पाण्याने भरल्यामुळे शेतकरी भात लावगडीच्या कामाला लागले आहेत. आधी चिखलातील नांगरणी त्या पाठोपाठ भात लावण्याच्या कामाला वेग आला आहे. मुळशी खोऱ्यात प्रामुख्याने इंद्रायणी भातच उत्पन्न घेतल जात.

डोळ्यांना सुखवणारी ही भात लावणीची लगबग या भागात फिरायला गेलेल्या पर्यटकांना देखील खुणावते. त्यामुळे लावसाला फिरायला निघालेली पर्यटन मंडळी भात लावणीचा आनंद घेऊनच पुढे निघतात.

दऱ्या खोऱ्यातल्या या आदिवासी शेतकऱ्यांनी मात्र इंद्रायणी भाताची शेती अजूनही राखून ठेवली आहे. आणि तिच्यात आधुनिकता देखील आणली आहे. भात लावणीची ही दोरी पद्धती त्याचच एक उदाहरण म्हणलं पाहिजेल. भात लावणीचा हाच मुळशी पॅटर्न पर्यटकांना खुणावतोय. त्यामुळे हौशी पुणेकर सुट्टीच्या दिवशी भातलावणीचा आनंद लुटताना दिसत आहेत.