वीट भट्टीवर काम करणाऱ्या तरुणीवर गोळीबार ;प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा संशय

पुणे : विट भट्टीवर काम करणाऱ्या तरुण मुलीवर
गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घडलीय.
काजल लक्ष्मण शिंदे असं या जखमी मुलीचं नाव असून  विटभट्टीवर ती काम करत असताना एका अज्ञात तरुणानं तिच्यावर गोळीबार केला. खेड तालुक्यातील शिरोली इथं ही घटना घडलीय.
या घटनेत मुलीच्या छातीत गोळी घुसल्यानं ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तात्काळ तिला राजगुरुनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रेमप्रकरणातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. गोळीबारानंतर फरार झालेल्या हल्लेखोराला खेड पोलिसांनी अटक केलीय.कृष्णा रजपूत असे हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे
.