fbpx

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाती भोपळा – कुमारस्वामी

टीम महारष्ट्र देशा : लोकसभेमध्ये आज भाजप सरकारचे अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पातून किसान , जवान , मध्यम वर्गीय माणूस, यांना केंद्रस्थानी ठेवून विवध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. हे अर्थसंकल्प जनहितकारी असल्याच म्हंटल जात आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र ट्वीटरच्या माध्यमातून या अर्थसंकल्पाबाबत काही प्रश्न केले आहेत. सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी तयार केला होता की राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने? असा सवाल त्यांनी केला आहे.

अर्थसंकल्प पियूष गोयल यांनी लोकसभेत मांडले. अर्थसंकल्प मांडल्यानंतर अनेकांनी हे अर्थसंकल्प जनहितकारी असल्याच म्हंटल आहे पण विरोधकांनी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हाती भोपळा आल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, गोयल यांनी सादर केलेला अर्थसंकल्प कोणत्या आर्थिक खात्यातील अधिकाऱ्यांनी तयार केला होता की आरएसएसने? असा टोला कुमारस्वामींनी यावेळी लगावला आहे. तसेच या अर्थसंकल्पातून मोदी सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवले. जेव्हा मी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती, तेव्हा पंतप्रधानांनी त्यास लॉलीपॉप असे संबोधले होते, असेही कुमारस्वामी म्हणाले.