fbpx

पाकिस्तानला मोठा झटका, पुलवामा हल्यातील मास्टरमाइंड गाझीचा खातमा

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा हल्यातील मास्टरमाइंड अब्दुल रशीद गाझीला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामा येथील पिंगलान भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गाझीला ठार करण्यात आलं आहे. दरम्यान. या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत.

मध्यरात्री 1 वाजल्यापासून लष्कराकडून पिंगलानमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. यामध्ये पुलवामाच्या मुख्य तीन सूत्रधारांपैकी अब्दुल गाझी आणि त्याचे साथीदार एका इमारतीमध्ये लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. दहशतवादी दडून बसलेल्या इमारतीला जवानांनी घेराव घातला होता. दहशतवादी लपलेली इमारत स्फोट करुन उडवण्यात आली आहे. यामध्ये अब्दुल रशिद गाझी ठार झाला आहे. त्यामुळे लष्कराचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. गाझीचा आयईडी बॉम्ब बनवण्यात हातखंडा होता.

दरम्यान, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर डी.एस. डोंडीयाल यांचा समावेश असून, सावेराम, अजय कुमार, हरी सिंग या जवानांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. हे जवान ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफमधील असल्याची माहिती मिळत आहे