‘जो पोहारादेवीत येईल त्याला खर बोलावंच लागेल’, पूजा चव्हाणच्या आजी आक्रमक

sanjay rathod puja

यवतमाळ : परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड कुठे आहेत, असा प्रश्नही विरोधक विचारत आहेत. इतके दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहिलेले संजय राठोड आज (23 फेब्रुवारी) पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत.

संजय राठोड सहपरिवार पोहरादेवीत येतील. ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतील, संत रामराव बापू आश्रमाला भेट देतील, धर्मपीठावर जाऊन भक्तीधामला भेट देऊन निघून जातील. राठोड माध्यमांशी बोलणार की नाही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठिशी शिवसेना पक्षही उभा असल्याचे चित्र आता समोर येत आहे. कारण, पोहरादेवीला जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होताना दिसत होता. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवला आहे.

दरम्यान, संजय राठोड पोहरादेवीत येत असताना पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी प्रतिक्रिया देत संजय राठोड यांचे नाव न घेता त्यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. ‘जो पोहारादेवीत येईल त्याला खोट बोलून चालणार नाही, त्याला खर बोलावंच लागेल’ अस शांताबाई राठोड म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या