Share

Rupali Thombre | “छुपी युती असेल किंवा नसेल ती जगजाहीर करा, कटकारस्थान करू नका”

Rupali Thombre | पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही मनसेने शिवाजीपार्कवर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं एकाचवेळीसोबत असल्यामुळे, राजयकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या रूपाली ठोंबरे Rupali Thombre यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombbre)

भाजप आणि मनसे पक्षामध्ये युती आहे का ? छुपी युती असेल तरी जगजाहीर करा आणि युती झाली नसेल तरी जगजाहीर करा, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी एकप्रकारे आवाहनंच दिलं आहे. रूपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. छुप्या युती करून कटकारस्थान करू नका, राजकारण खराब करू नका असे म्हणत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेच्या समस्येवर प्रकाश टाकावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, दिवाळीच्या कार्यक्रमात कोणी कुठेही जाऊ शकतं.परंतू मनसेच्या सुख-दुखात सोबत उभे राहताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंतकरणापासून उभे रहावेत, अशा आमच्या सदिच्छा असल्याचं रूपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्ला केला. या वर्षी सर्व सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याचं आमच्या सरकारने ठरवलं होतं. हे वचन आम्ही पाळलं आहे. आत्तापर्यंत सर्व दबून बसले होते. मात्र, आता सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचं शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Rupali Thombre | पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now