… तर जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही, शरद पवार यांचा निर्वाणीचा इशारा

modi

मुंबई : मोदी सरकारने घटनेचा विचार न करता पायमल्ली करून कायदे केला, बहुमताच्या जोरावर कायदा केला. बहुमत डावलत कायदा केला तर जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहत नाही’, अशा शब्दांत राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेनं भव्य मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चाला खासदार शरद पवार यांनी आझाद मैदानात संबोधित केलं. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधी विचारपूस केली का, असा सवाल देखील शरद पवार यांनी विचारला आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलक करणारे शेतकरी पंजाबचे असल्याचं सांगतात. पंजाब काय पाकिस्तानमध्ये येतं का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे.

मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली असल्याचे देखील वृत्त आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानापासून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.

मंत्रालयाकडून इस्टर्न एक्सप्रेस हायवे, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर दोन्ही रस्त्यावर पोलिसांची बॅरिकेटिंग आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.