अहमदनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक ठप्पा

public transport

अहमदनगर – भीमा-कोरेगाव येथीलि घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे नगर मधील सार्वजनिक प्रवासी सेवा पूर्णत: बंद राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. काही गावांमध्ये आंदोलनकर्तानी काही बस गाड्यांवर दगडफेक केली तर काही ठिकाणी दूध संघाच्या कार्यालयांची तोडफोड करून दूध ओतून दिले.

Loading...

दरम्यान जिल्ह्यात काही किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. काही ठिकाणी व्यवहार सुरळित होते. मात्र काही ठिकाणी बंद ला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या दगडफेक,जाळपोळ व हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र बंदच्या आंदोलनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.नगर शहरासहीत संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासूनच एसटी ची बस वाहतुक जवळपास पूर्णपणे ठप्प झाली होती.नगर शहरातील स्वस्तिक बस स्थानकात दुपारी 1 वाजेपर्यंत दररोज सुमारे 240 ते 250 बस गाड्या ये-जा करीत आसतात बुधवारी मात्र अवघ्या 10 बस या बस स्थानकात येऊ शकल्या. तसेच शहरातील माळीवाडा बस स्थानकात देखील अतिशय मोजक्याच बस गाड्या येऊ शकल्या होत्या.शहरातील प्रमुख बस स्थानक असलेल्या तारकपूर बस स्थानकात मात्र सकाळपासून एकही बस गाडी बाहेर सोडण्यात आली नाही.

त्यामुळे तीनही बस स्थानकांमध्ये शुकशुकाट होता.त्या बरोबरच शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुक करणारी मनपाची एएमटी ही बस सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती.सकाळच्या वेळी बाहेरगावी जाणारे व बाहेरून आलेल्या प्रवाशांचे वाहतुकीसाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने मोठे हाल झाले.जामखेड तालुक्यात बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.जामखेडमध्ये दलित संघटनांनी एक मोठी रॅली काढली होती.सकाळच्या वेेळी तालुक्यातील जवळा येथे एका बस वर दगडफेक करण्यात आली.

जवळा येथे एका दूध संघाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या व तेथील दूध रस्त्यावर ओतून दिले.तसेच राहाता तालुक्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.पारनेर तालुक्यातील निघोज,ढवळपुरी,भाळवणी,आदि ठिकाणी बंद पाळण्यात आला.पारनेरमध्ये ही एसटीची वाहतुक पूर्णपणे बंद होती.श्रीगोंदा,संगमनेर,कोपरगाव आदि तालुक्यांमध्ये बुधवारच्या बंदला प्रतिसाद मिळाला.

दरम्यान नगर शहरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.शहराच्या अंतर्गत चालणारी महापालिकेची बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र रिक्षांची वाहतुक सुरळितपणे सुरू होती.शहरात काही शाळा महाविद्यालयांनी अघोषित सुट्टी जाहीर केली होती.तर काही महाविद्याल यांमध्ये सध्या 12 वीच्या पूुर्व परीक्षा सुरू असल्याने बुधवार चा पेपर रद्द करण्यात आल्याचे फलक महाविद्यालयांच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आले होते.शहरातील दिल्ली दरवाजा,नीलक्रांती चौक,माळीवाडा,आदि भागात बंदचा मोठा परिणाम दिसून आला.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीसांनी शहरात संवेदनशील भागांमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला होता

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...