दुग्धनगरी कचरा प्रकल्प विरोधातील जनहित याचिका निकाली

court

औरंगाबाद: चिकलठाणा येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. या विरोधात चिकलठाणावासीयांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली होती. यावर नेमलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयाचे परीक्षण करणे योग्य नाही असे म्हणत. न्यायालयाने याचिका निकाली काढली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कचरा निर्मूलनासाठी महानगरपालिकेने उच्चस्तरीय समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असुन या समितीने शहरातील विविध भागांत पाहणी करून अखेरीस चिकलठाण्यामधील दुग्धनगरीची जागा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निवडली. यास विरोध दर्शवीत चिकलठाण्यामधील नागरिकांनी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात सादर केली. प्रस्तावित प्रकल्प विमानातळापासून अवघ्या दीडकिलोमीटर अंतरावर असून तिथे कचरा प्रकल्प उभारल्यास नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन होईल. असे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले होते. याचिकाकर्त्या तर्फे अॅड. प्रज्ञा तळेकर व मनपाकडून अॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पहिले.