Andheri Byelection | मुंबई : भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी पूर्व विधानसभा‘ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदार संघातील जे मतदार कामासाठी बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू असणार आहे.
ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व‘ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
या पोटनिवडणुकीत ( Andheri Byelection ) मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहेत तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | ऋषिकेश ला फिरायला जाण्याचा प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
- Raj Thackeray | राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली?, जाणून घ्या सविस्तर
- Travel Guide | ऋषिकेश ला फिरायला जाण्याचा प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
- Uddhav Thackeray। “…त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी गेम केला” ; शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट
- Health Care Tips | झपाट्याने वजन वाढायचे असू शकते ‘हे’ कारण