प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा ३ ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव

RTO Vehicle

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई, पूर्व या कार्यालयामार्फत मोटार वाहन कर कायदा १९८८ च्या कलम १२ ब अन्वये मोटार वाहनांचा कर न भरल्यामुळे अटकावून ठेवण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

अशी वाहने ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा तशाच परिस्थितीत या वाहनांचा ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जाहीर लिलाव होणार आहे. ज्या कोणी खरेदीदारास सदर वाहनांची खरेदी करायची असेल, त्यांनी लिलावाच्या तारखेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई, पूर्व यांच्याकडे संपर्क साधावा.

लिलावाच्या अटी व शर्ती, अनामत रकमेबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, ज्या वाहनधारकांची वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत, त्यांनी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करून कर व दंड भरून लिलावाच्या तारखेपूर्वी वाहने मुक्त करुन घ्यावीत. लिलावाच्या तारखेनंतर याबाबतची कोणतीही विनंती स्वीकारण्यात येणार नाही.

. . . म्हणून मुंबईत मराठा आंदोलन पेटले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेना सत्तेत : रवी राणा