गेमिंग कम्युनिटीसाठी खुशखबर , PUBG करणार कमबॅक

PUBG

मुंबई; भारत चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्शवभूमीवर भारतने चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. मागील आठवड्यात भारतने ११८ ऍप्सवर बंदी घातली होती त्यात pubg चाही समावेश होता त्यामुळे pubg खेळणाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.मात्र आता pubgभारत कमबॅक करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील PUBG Mobileवरील Tencent Gamesचे कंट्रोल संपुष्टात आणले जाईल आणि आता याची जबाबदारी PUBG कॉर्पोरेशन घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मूळ दक्षिण कोरियातील गेमिंग कंपनी आता जबाबदारी स्वीकारत आहे आणि असे झाल्यास देशातील PUBG वरील बंदी लवकरच काढून टाकली जाऊ शकते.

PUBG कॉर्पोरेशन देशातील सर्व जबाबदाऱ्या घेणार आहे. कंपनी येत्या काळात भारतात स्वतः PUBG अनुभव देण्याच्या तयारीत आहे. PUBG कॉर्पोरेशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘PUBG कॉर्पोरेशनने प्लेयर डेटाची गोपनीयता आणि सुरक्षा ही कंपनीला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याने सरकारने घेतलेल्या उपायांचा पूर्णपणे आदर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

ठाकरे सरकार सुशांत प्रकरणी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात: अतुल भातखळकर

केवळ पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या- स्नेहलता कोल्हे

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेशामधील 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपध्दती रद्द