एचपीचा ‘एक्स ३६०’ लॅपटॉप भारतात दाखल

blank

 टीम महाराष्ट्र देशा : तंत्रज्ञानाच्या युगात रोज काहीतरी नवीन ग्राहकांसाठी बाजारपेठेत येतं असतं. एचपी कंपनीने आपल्या ‘पॅव्हिलॉन’ या मालिकेतील ‘एक्स 360’ या कन्व्हर्टीबल प्रकारातील नवीन लॅपटॉपला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

सध्या बाजारात कन्व्हर्टीबल लॅपटॉपला ग्राहकांकडून पसंती मिळत असून यात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याची सुविधा देण्यात आलेली असल्यामुळे विविध प्रोफेशन्समध्ये याचा वापर वाढला आहे.  विशेष करून विद्यार्थी तसेच नोट्सची आवश्यकता असणाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. यापार्श्वभूमीवर, एचपी कंपनीचा पॅव्हिलॉन एक्स 360 हा लॅपटॉपदेखील याच प्रकारातील अर्थात ‘टु-इन-वन’ या पध्दतीत वापरण्याच्या सुविधेने सज्ज झाला असून याची डिझाईन ही अतिशय आकर्षक अशीच आहे. याचे वजन अवघे 1.68 किलो इतके असल्यामुळे तो कुठेही सुलभपणे वापरता येईल. यातील डिस्प्ले हा 14 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात 1920 बाय 1080 पिक्सल्स क्षमतेचा असून यात बी अँड ओ ही अतिशय दर्जेदार ऑडिओ सिस्टीम देण्यात आलेली आहे.

यात इंटेलच्या आठव्या पिढीतील कोअर आय-5 आणि आय-7 या प्रोसेसरचे पर्याय उपलब्ध आहेत. यात इंटेलच्या ‘ऑप्टेन मेमरी’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामुळे प्रोसेसींगचा वेग जवळपास 28 टक्क्यांनी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय एनव्हिडीयाच्या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यामध्ये एचपीच्या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 11 तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एचपीच्या या लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली असून यामुळे हे मॉडेल सुरक्षितपणे वापरता येईल. तर यामध्ये 120 अंशाइतक्या वाईड अँगलने युक्त असणारा 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. यावर स्टायलस पेनचा वापर करून रेखाटने करता येतील. याच्या विविध व्हेरियंटचे 50,347 रूपयांपासून सुरू होणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येईल.

पॅनला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढली…

सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट