कॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण

blank

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मनसे आघाडीमध्ये सामील होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसची मनसेला आघाडीमध्ये घेण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असून जागा वाटपा बाबत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील बैठक मुंबई मध्ये या आठवड्यात होणार आहे.कॉंग्रेस मनसेला कधीच सोबत घेणार नाही असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने नोटाबंदी घेतलेल्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पुण्यात काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी पृथ्वीराज चव्हाण केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका देखील केली.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण हे पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र दस्तुरखुद्द चव्हाण यांनीच या प्रश्नावर आपलं मत व्यक्त केलं असून मी दक्षिण कराड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.