पुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र दस्तुरखुद्द चव्हाण यांनीच आता या प्रश्नावर आपलं मत व्यक्त केलं असून मी दक्षिण कराड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Rohan Deshmukh

केंद्र सरकारने नोटाबंदी घेतलेल्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पुण्यात काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी पृथ्वीराज चव्हाण केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका देखील केली.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...