त्रिपुरामध्ये दहशतवाद्यांशी युती केल्यानेच भाजपची सत्ता – पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : त्रिपुरात भाजपनं आदिवासी आतंकवादी संघटनेशी युती केली, सत्तेवर येण्यासाठी तडजोड केली आहे. आम्ही कोणत्याही आतंकवादी संघटनेशी तडजोड केली नाही. असा सनसनाटी आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुंबई आयोजित अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या 39व्या अधिवेशनात बोलत होते.

तर ईशान्य भारतात झालेल्या या निवडणूकांचा परिणाम देशात अजिबात होणार नाही. पोटनिवडणूकांमध्ये भाजपला लोकांनी नाकारलंय हे दिसून येतंय. असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी मृख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, दक्षिणेत दाळ शिजत नाही हे पाहून भाजपनं ईशान्य भारतात प्रयत्न केला आहे. पण त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा सामना करायचा आहे यात काही फरक पडणार नाही. असंही ते म्हणाले

You might also like
Comments
Loading...