बोंडअळीग्रस्त कापूस शेतक-यांना हेक्टरी 30 ते 37 हजारांची मदत देणार- फुंडकर

Provide 30 to 37 thousand of hectare to the farmers
Provide 30 to 37 thousand of hectare to the farmers

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला आज, शुक्रवारी राज्य सरकारनेकापूस, धान, फळपीक आणि भाजीपाल्यासाठी मदत जाहीर केली. त्यानुसार कापसाला हेक्टरी 30 ते 37 हजार रुपयांची मदत दिली जाईल. धानाला हेक्टरी 7 हजार 970 रुपये ते 14 हजार 670 रुपये मदत दिली जाईल. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राहील. त्याचप्रमाणे धानाला प्रति क्विंटल 200 रुपये बोनस देण्याची घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली.

यासंदर्भात माहिती देताना कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले की, कापसाला दिली जाणारी मदत ही एनडीआरफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक), पीक विमा योजना व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत मिळणारी मदत, असे तिन्ही एकत्रित करून दिली जाईल. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून 6 हजार 800 रुपये, पीक विमा अंतर्गत 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत 16 हजार रुपये असे एकूण 30 हजार 800 रुपये मिळतील.

तर बागायती कापूस उत्पादकाला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून 13 हजार 500 रुपये, पीक विमा अंतर्गत 8 हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत 16 हजार रुपये असे एकूण 37 हजार 500 रुपये मिळतील. त्याचप्रमाणे कोरडवाहू धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून 6800 रुपये व पीक विमा अंतर्गत 1170 रुपये असे एकूण 7 हजार 970 रुपये मिळतील. ओलिताच्या धान उत्पादकांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून 13 हजार 500 रुपये, पीक विमा अंतर्गत 1170 रुपये असे एकूण 14 हजार 670 रुपये मिळतील.

Loading...

याशिवाय धानाला प्रति क्विंटल 200 रुपये बोनस दिला जाईल व ही मर्यादा 50 क्विंटलपर्यंत असेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच फळपीकांसाठी एनडीआरफमधून 18 हजार रुपये व पीक विमा अंतर्गत 9 ते 25 हजार रुपयांची मदत मिळेल. भाजीपाला उत्पादकांना हेक्टरी 13 हजार 500 रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे फुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

1 Comment

Click here to post a comment