पैठण शहरासाठी एकाच वर्षात तब्बल २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला; आ. संदिपान भुमरेंची वाहवाई!

sandipan bhumre

औरंगाबाद : धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पैठण शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या विविध फंडांतून एकाच वर्षात तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यातून वारकरी व पर्यटकांना तसेच पैठणकरांना मुलभूत नागरी सुविधा प्राप्त होत आहेत. अशी माहिती फलोत्पादन व रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या पैठण शहरात वारकरी-पर्यटकांची लगबग पुन्हा सुरू झाली आहे. नाथ सागर जलाशयाच्या दरवाजांंद्वारे पाणी सोडले जात असल्याने हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड ऊडत आहे. दरम्यान मागील एका वर्षातच तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी पैठण शहरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून अनेक कामे पुर्ण झाली असुन काही प्रगतीपथावर आहेत. तर काही प्रस्तावित आहेत.

याबाबत माहिती देताना रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले की, वर्षारंभी १२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला होता. त्यातून स्वामी समर्थ मंदिराच्या विकासकामी ७० लाख तर मुस्लिम शादीखाना यासाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्मशानभूमी, कब्रस्थान, भावसार व गवळी समाजाच्या मागणीनुसार सामाजिक सभागृहे व सुरक्षाभिंती उभारण्यात आलेल्या आहेत.

४० लाख रुपयांचा खर्च करुन शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरणाचे काम युध्दपातळीवर चालू आहे. तसेच पाचोड फाट्यावरील महेश चौकाच्या सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत. हे काम चालू आहे. प्रत्येक वार्डांमध्ये सिमेंट रस्ते व सांडपाणी निचरा व्यवस्था यांची कामे केली जात आहेत. जायकवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसित वसाहतीत नागरी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ५ कोटी रुपयांचा फंड नुकताच देण्यात आला असून आणखी ३ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. यातून शहरात ‘हायमस्ट’ दिवे व विद्युत व्यवस्था अद्ययावत केली जाणार आहे. असेही भुमरे यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या