जिल्हयात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांची तात्काळ माहीती द्या – डीवायएसपी टिपरसे

corona village ban

तुळजापूर – कोरोना चा वाढत जाणारा प्रार्दुभाव पाहता सरहद्द वरुन अनाधिकृणपणे ये जा करणारे मास्क न वापरणे दुचाकी वरुण फिरणा-यांची तात्काळ प्रशासनास देण्याची सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिले, तुळजापूर येथील उपविभागीयपोलीसअधिकारी कार्यालयात तुळजापूर उपविभागातील ठाणे प्रभारी सरपंच पोलिस पाटील कोरोना वाँरीयर्स यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप टिपरसे म्हणाले की तुळजापूर उपविभागात बाहेर जिल्हातुन इतर ठिकाणीहुन येणाऱ्यांची सोलापूर जिल्हा सरहदूदीवरुन अनाधिकृतपणे ये जा करणारे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे, दुचाकीवरुन फिरणारे,सोशल डिस्टंन्स न पाळणारे, गावात कोरानाचे लक्षणे दिसुन येणाऱ्यांची याची माहीती प्रशासनास तात्काळ देण्याची सुचना केली.

गावात क्वारटांईन च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवास्थेचा प्रश्न याची गावपातळीवर दक्षता घ्यावी व याची माहीती तात्काळ पोलिस प्रशाषाणास देण्याची सुचना केली.या बैठकीस तुळजापूर ठाणे प्रभारी पोलिसनिरक्षक हर्षवर्धन गवळी नळदुर्ग प्रभारी राऊत तामलवाडी सपोनी राठोड सपोनी राऊत सपोनी दांडे सह सरपंच पोलिस पाटील उपस्थितीत होते.

अपयशाबद्दल राजीनामा देण्याची पद्धत व नीतिमत्ता आपल्या देशात नाही, राऊतांचा भाजपला टोला