आरोप सिद्ध करा नाहीतर जेलमध्ये टाकू, ममतांचा मोदींना गर्भित इशारा

टीम महाराष्ट्र देशा : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यामधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या हिंसाचारात थोर विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली होती, हि मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा – मोदींनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा जेलमध्ये टाकू, असा गर्भित इशारा दिला आहे.

कोलकातामध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. हा पुतळा भाजपच्या गुंडांनी फोडल्याचा आरोप ममता बॅनर्जी करत आहेत, तर मोदी – शहा यांनी मात्र तृणमूलच्या गुंडांनी मूर्तीची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला ममता बनर्जीच जबाबदार

संपूर्ण देशात ६ टप्यात मतदान झाले त्यावेळेस कुठेही हिंसाचार झाला नाही. मग केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचाराची घटना का घडली. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला तृणमूल कॉंग्रेस आणि ममता बनर्जी जबाबदार आहेत. दगडफेक करणारे कार्यकर्तेही तृणमूल कॉंग्रेसचेच होते. असे अमित शाह यांनी म्हंटले. पराभव दिसत असल्याने केवळ मतांच्या राजकारणासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली, अशी टीका शहा यांनी केली आहे.

आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, बघुयात काय होतय ते ! – मोदी

दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर निवडणूक आयोगाने बंगालमधील प्रचारावर आज सायंकाळपासूनच बंदी घातली आहे. तर पंतप्रधान मोदी बंगालमध्ये शेवटची सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी मध्य प्रदेशात आयोजित सभेत बोलताना मोदी यांनी आज पुन्हा एकदा बंगालमध्ये जाणार आहे. पाहुया, आता काय होते, असे म्हणत ममतांना आव्हान दिले आहे.Loading…
Loading...