नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाल्याने या अधिवेशनाची सुरवात वादळी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे. यावरुन आता मोठा वाद उफाळला आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सर्व विरोधी पक्ष राज्यसभा सदस्यांना पूर्ण अधिवेशनासाठीच निलंबित करण्यात आले. या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना सदस्यांनी माफी मागितली तर कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संसद भवन परिसरामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. तीन पक्ष आता लोकसभेतून बाहेर पडली आहेत. सोमवारी शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यावरुन हा मोठा वाद सुरु झाला आहे. तीन्ही पक्षांच्या खासदारांनी आता संसद भवन परिसरामध्ये निदर्शने सुरु केली आहेत.
लोकतंत्र में भाजपाई हिटलरशाही के खिलाफ विपक्षी दलों के साथ कांग्रेस सांसद संसद परिसर में गाँधी जी की प्रतिमा के समक्ष प्रदर्शन कर रहे हैं।
भाजपा सरकार को विपक्ष के 12 सांसदों का निलंबन निरस्त करना होगा, तानाशाही नहीं चलेगी। #BJP_चर्चा_से_डरती_है pic.twitter.com/M3bo5qI4KX
— Congress (@INCIndia) November 30, 2021
कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या 5 पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून या विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर आम्ही अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
- ‘मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना…’, सदाभाऊंचा बच्चू कडूंना सल्ला
- …म्हणून ममता बॅनर्जी घेणार आहेत शरद पवारांची भेट
- ‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला
- ‘चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय’, नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला