बारामती: देशात सध्या इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे केंद्रात तसेच राज्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सतत केंद्र सरकारचा इंधन दरवाढीवरून विरोध केला जात आहे. दरम्यान त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पेट्रोल विरहीत इलेक्ट्रिक रिक्षा चालवली आहे. आता यावरूनच नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत.
नेमकं अजित पवारांनी यातून पेट्रोल दरवाढीचा विरोध केला की, आणखी काही अशा चर्चा आता यातून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे दादांची रिक्षास्वारी ही इंधनदरवाढीवर विरोध करणारी होती काय अशा चर्चा आता केल्या जात आहेत.
पियोजिओ कंपनीने विकसित केलेली इलेक्ट्रीक रिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवली. त्यांनी कंपनीच्या आवारात फेरफटका मारत गाडीची तपासणी केली. पियोजिओ कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून बारामती नगरपालिकेस तीन इलेक्ट्रीक, एक सीएनजी व एक पेट्रोलवरील अशा पाच रिक्षा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात – सावंत
- ‘राणे गेल्यापासून भाजप दहा फूट मागे, एक दिवस असा येईल की..’, राऊतांचा इशारा
- ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक
- ‘काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती तेव्हा…’ शेलारांची शिवसेनेवर टीका
- ‘अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काही जणांनी येड्यांच्या जत्रा केल्या,’ संजय राऊतांचा घणाघात