मुख्यमंत्र्यांच्या सभेत निषेधाच्या घोषणा, अमरावतीत धरणग्रस्त आक्रमक

cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे, तर मागील काळामध्ये सरकारकडून न्याय न मिळालेला घटक देखील आक्रमक होताना दिसत आहे.

अमरावतीमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन धरणग्रस्तां रोषाला समोर जाव लागलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत हा प्रकार घडला आहे. फडणवीस भाषणाला उभे राहिल्यानंतर २० ते २५ धरणग्रस्तांनी अचानक घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. त्यामुळे काही काळासाठी गोंधळ उडाल्याच दिसून आलं.

धारणासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळाला नसल्याची तक्रार धरणग्रस्तांकडून करण्यात येत होती. दरम्यान, पोलिसांनी निषेधाच्या घोषणा देणाऱ्यांना अटक केल्याने सभा सूरळीत पार पडली.

मोदींच्या सभेत काळ्या कपड्यावर बंदी

दोन दिवसांपूर्वी सुजय विखे यांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभा ठिकाणी काळ्या कपड्यावर बंदी घालण्यात आली होती. या सभेला नगर आणि शिर्डी मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सुरक्षेचं कारण देत काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली होती, विशेष म्हणजे यावेळी काळ्या रुमालासह काळे बनियान, सॉक्स देखील काढल्यानंतरच मैदानात प्रवेश देण्यात आला.