शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

protest

बीड : शासनाने दिवाळीच्या सुट्टयात बदल्या प्रक्रिया राबवल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाभरातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो शिक्षकांचा सहभाग होता. दुपारी जिल्हा स्टेडीयम या ठिकाणीवरून मोर्चाला सुरूवात झाली होती. राज्य शासनाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया हाती घेतली. त्याची सुरूवात दिवाळीच्या सुट्ट्यात करण्यात आली. मात्र या बदली प्रक्रियेला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे.

शैक्षणिक सत्र अर्ध्यावर असतांना शिक्षकांच्या बदल्या करून शासन फुट पाडत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला. ऑनलाईन होणा-या बदल्या तात्काळ रद्द कराव्यात व मे मध्ये 2014 च्या शासन निर्णयानुसारच सर्व शिक्षकांना न्याय देणा-या बदल्या कराव्यात. दि.23.10.2017 रोजीच्या निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करावी. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आला होता.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...