शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर छावा संघटनेचा पैठणमध्ये शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा

पैठण / प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आज अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने पैठण तहसिल कार्यालयावर जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.  छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते तहसिल कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

तीन वर्षांपासुन दुष्काळी परिस्थीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाणही वाढले आहे. हे सरकार आल्यापासुन आजपर्यंत शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झालेला नाही. त्यातच ऊस, कापुस,सोयाबीन, तुर आदी हातातोंडाशी आलेली पिके आस्मानी व सुलतानी संकटामुळे वाया गेली आहेत. त्याचे आजपर्यंत पंचनामे देखिल झाले नाहीत. तसेच महावितरण विभागाने सक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडुन त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

bagdure

यावेळी शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करून ७/१२ कोरा करा, बोंड आळीने उध्वस्त कापुस उत्पादक शेतकऱ्यांना विना अट एकरी तिस हजार रूपये मदत मिळावी, कृषी पंपाची कट केलेली विज तात्काळ जोडा व विज बिल सरसकट माफ करा, स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागु करा, पेरणी ते कापणी कामाचा मनरेगात समावेश करा, ऊसाला प्रति टन ३१०० रूपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जि.अध्यक्ष, किशोर शिरवत, संतोष जेधे, पंजाबराव काळे, देवकर्ण वाघ, जालिंदर एरंडे, भगवान निवारे,संजय मोरे, तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते,अभिजीत औटे,अर्जुन खराद, किरण सातपुते, भागवत भुमरे, एकनाथ मानमोडे, उध्दव कळसकर, कृष्णा साळुंके, परमेश्वर क्षीरसागर, महेश शिंदे, आप्पा गिरगे, व्यंकटेश लांडगे, राहुल काशिद, शिवकुमार माळवदकर, निलेश गटकळ, लक्ष्मण शिंदे, रोहीत भोपळे, आशिष झराड, विजय शिरवत, सुनिल दाने, आकाश घुले, ज्ञानेश्वर गावंडे, विश्वनाथ पऱ्हाड, दत्ता चिंचखेडे, मुकुंद शिरवत, रामेश्वर डोईफोडे, सुरज तवार सुनिल मोरे, आकाश गवळी, रवि घोडके, नागेश भडके, महेश नरके, ऋषी ठेणगे, मिसाळ, शहादेव धनाईत, श्रीकांत जोशी, योगेश राऊत, अमोल सोलाट, ओम तवार, रामेश्वर हापसे, अभिजीत उंदरे, मंगेश शिरवत, राहुल नरवडे, आमोल ताकपीरे,रोहीत औटे, शंतनु सोनार उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...