अहमदनगर : जिल्हा काँग्रेसच्या वतीने कर्नाटकात काँग्रेसवर झालेल्या अन्यायाविरुद्ध निदर्शने

अहमदनगर/प्रशांत झावरे : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असताना येथील राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्याची संधी देऊन लोकशाहीचा व घटनेतील तरतुदींचा खून करून लोकशाहीचा गळा घोटाळा असल्याचा आरोप करीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीचा काळा दिवस संबोधून या घटनेचा निषेध नोंदवत निदर्शने केली. आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या मेघालय, मणिपूर व गोवा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या असतांनासुद्धा काँग्रेस पक्षाला सरकार बनविण्याची संधी नाकारण्यात आलेली होती. उलटपक्षी कर्नाटक मध्ये राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन मेघालय, मणिपूर व गोवा या राज्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. ही बाब अत्यंत चुकीची व लोकशाहीचा गळा दाबणारी असून, यामुळे काल अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधी पार पडलेला आहे. ही बाब असंविधानिक असून लोकशाहीच्या तत्वाला काळिमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्ष व केंद्र शासन देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, सचिन घोडके, शामराव वागस्कर, सुनीता साळवी, रजनी ताठे, गौरव ढोणे, बाळासाहेब भंडारी, आर.आर. पिल्ले, नलिनीताई गायकवाड, निजाम जहागीरदार, योगेश दीवाने, डॉ.जायदा शेख, रुपसिंग कदम, दिलीप सकट, मयूर पाटोळे, जरीना शेख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You might also like
Comments
Loading...