fbpx

टेंभूच्या पाण्यासाठी युवकांचे उपोषण, पांठिब्यासाठी सांगोल्यात कडकडीत बंद

सांगोला : सांगोला तहसील कार्यालयासमोर दीपक पवार आणि दत्त टापरे हे सांगोल्यातील दोन तरुण पाण्यासाठी मागील आठ दिवसांपासून सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. टेंभू योजनेद्वारे माण नदीतील बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी त्यांनी जनावरांसह हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

सांगोल्यात सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. दोन तरुणांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला आसपासच्या गावांमधील लोकांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. 14 गावांमधील शेतकरी आपल्या जनावरांसह तहसील कार्यालयासमोर तळ ठोकून बसले आहेत. तसेच पाणी आल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे.

संजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात

करमाळ्यात सरकार विरोधी तिरडी आंदोलन

दूध भेसळखोरांना राजकीय आश्रय – राजू शेट्टी