जनलोकपालसाठी अण्णा पुन्हा मैदानात

अण्णा हजारे

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा जनलोकपालसाठी रणांगणात उतरत आहेत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णा दिल्लीत आंदोलन करणार आहेत. राळेगणसिद्धी येथे झालेल्या दोन दिवसीय नियोजन बैठकीत अण्णांनी हा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसलाही प्रतिसाद देत नसल्याने आंदोलन होणारच अस अण्णांनी याआधीच जाहीर केल आहे. पण त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करण्याची भूमिका सुद्धा जाहीर केली होती. आता आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आण्णांच्या इशाऱ्याला किती गांभीर्याने घेते हे पाहण्यासारख असणार आहे

दरम्यान, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त देशासाठी जनलोकपाल गरजेचा असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.