भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे ‘जन हाहाकार’ आंदोलन

पुणे : भाजप सरकार एकीकडे विकासाच्या वल्गना करत असताना सामान्य नागरिकांना जीवन जगणेच असह्य झाले आहे. जीवनाशयक वस्तूंच्या प्रचंड दर वाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे आज शनिवारी भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जन हाहाकार’ आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस,जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या ‘जन हाहाकार’आंदोलनाला काळेवाडी येथून सुरुवात झाली. या मोर्चाला मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या मोर्चाचे नेतृत्व केले माजी आमदार विलास लांडे, विरोधीपक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील,यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.