एसटीच्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फॉर्च्युनर आणि स्कॉर्पियोचीच गर्दी

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारा विरोधात आज खा.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट बस स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं आहे. हे आंदोलन ग्रामीण असो की शहरी भागातील सामन्यांच्या प्रवासाचं साधन असणाऱ्या एसटी बस प्रशासनाच्या विरोधात होते. मात्र जे आंदोलनकर्ते होते ते मात्र लखलखीत, अलिशान फॉर्च्युनर आणि स्कॉर्पियो गाड्यातुन आले होते. आंदोलनकर्त्यांचा हा सर्व विरोधाभास स्वारगेट स्थानकात आलेल्या सर्व प्रवाशांना पाहायला मिळाला आहे.

सामन्यांसाठी असणाऱ्या या आंदोलनात नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या असामान्य अलिशान गाड्या अन तेही बस डेपोच्या आवारात बस ला अडथला येईल अशा उभा करण्यात आल्याने हे आंदोलन नक्की सामन्यांच्या फायद्याच की नेत्यांच्या राजकीय फायद्याच हेच प्रवाशांना उमजत नव्हतं.

आधीच दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामुळे स्वारगेट बस स्थानकात मोठ्या प्रमाणत बसला अडथळा येत होता. मात्र येथील सुरक्षा रक्षकांनी विनंती करूनही गाड्या काढल्या जातात नसल्याने तेही हतबल झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे एकंदरीतच सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या नेत्यांचा विरोधाभास या ठिकाणी दिसून आला आहे.