पञकारांवर आगपाखड करणा-या खा. दिलीप गांधी यांचा निषेध.

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी रेल्वे स्टेशन येथे राहुरी मांजरी रोडवरील रेल्वे  चौकी रेल्वेच्या दळणवळणामुळे  सातत्याने वेळोवेळी बंद  रहात असल्याने तालुक्याच्या पुर्व भागातील सुमारे 25 गावांचे ग्रामस्थ व राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे गेल्या 25 ते 30 वर्षांपासुन भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल बांधण्याची मागणी करीत असुन , या प्रश्नी उपोषण , रस्ता रोको , रेल्वे रोको अंदोलने करण्यात आली आहेत. याची दखल घेवुन रेल्वे प्रशासनाने सदर ठिकाणी  भुयारी मार्गासाठी ग्रीन सिग्नल दिला माञ खा. दिलीप गांधी यांनी सदर ठिकाणी उड्डाणपुलच व्हावा अशी मागणी लावुन धरल्याने भुयारी मार्गाला कोलदांडा बसल्याचे वस्तुनिष्ठ बातमी एका दैनिक वृत्तपञात प्रसिध्द झाल्याने खा. दिलीप गांधी यांना हि बातमी जिव्हारी लागुन त्यांचा तोल गेला व वळण येथे जाहिर कार्यक्रमात त्यांनी राहुरीचे पञकार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे बेताल वक्तव्य केले . त्यांच्या या वक्तव्याचा तालुक्यातील सर्व पञकारांनी तहसीलदार यांना निवेदन देवून निषेध केला आहे . त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात गांधी यांच्यावर जोरदार टीका देखील होत आहे .