कर्वे समाजसेवा संस्थेच्या वसतीगृहा बाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन

एका तासात वसतिगृह खाली करण्याचा संस्थेचा आदेश

पुणे : कर्वे समाजसेवा संस्थेच्या वसतीगृहात राहणाऱ्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एका तासाच्या नोटीसवर वसतीगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची खासगी दोन सदनिकांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी वसतीगृहाच्या बाहेरच ठिय्या मांडून बसले आहेत.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या वसतीगृहात 16 विद्यार्थी राहत आहेत. या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना वसतीगृह शुल्क म्हणून 21 हजार रुपये घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून वसतीगृह खाली करण्याचे तोंडी सांगण्यात येत होते. त्यांची पर्यायी व्यवस्था खासगी सदनिकांमध्ये करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जोपर्यंत वसतीगृह मिळत नाही तोपर्यंत निषेध सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

माहिती पुस्तीकेत संस्थेचे वसतीगृह असल्याचे सांगण्यात आले होते. आम्ही 21 हजार रुपये भरुन वसतीगृहात प्रवेशही घेतला. मात्र आम्हाला आता अचानक वसतीगृह खाली करण्यास सांगण्यात येत आहे. 16 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालवता येत नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात येत आहे.परंतु आम्ही
कोणत्याही परिस्थितीत वसतीगृह सोडणार नसून जोपर्यंत वसतीगृह मिळणार नाही
तोपर्यत प्रशासनाचा निषेध सुरूच राहणार आहे.
अक्षय वांद्रेकर, विद्यार्थी