जमाव बंदीचे आदेश असतानाही सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलने राज्यात सुरूच

Shaahin Bagh Protest

पुणे : कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक रेल्वे, चित्रपटगृह, मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स यांना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तर, मुंबईसह पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला दिल्लीतील शाहीन बागेतील आंदोलनातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सुरु झालेली आंदोलने सुरूच असल्याचे चित्र आहे.एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तानुसार नागपाडा येथे कोरोनाची भिती असताना देखील सीएएच्या विरोधात हे आंदोलन उद्याप सुरूच आहे. हिंगोलीत जमाव बंदीचे आदेश झुगारुण शेकडो लोक एकत्र आलेत. मोठ्या जमावाने शाहीनबाग आंदोलन सुरुच ठेवले आहे. बीडमधील परळीच्या शाहीनबाग आंदोलनालाही 50 हून अधिक दिवस झालेत. तरीही कोरोनाच्या भितीतही आंदोलनकर्त्यांच आंदोलन सुरुच आहे. पुण्यात मोमीनपुऱ्यात  देखील हे आंदोलन सुरूच राहणार असून जवळपास २०० महिला एकत्र येवून हे आंदोलन करीत आहेत अशी माहिती संयोजक खालिद आत्तार यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका पाहता ही आंदोलने मागे घ्यावीत यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू होते मात्र आंदोलकांनी सरकारच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. जमाव करणाऱ्या सामान्य नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देणारे प्रशासन या आंदोलकांवर कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्याच बरोबर जमाव बंदी या कायद्यात NRC CAA ला विरोध करणारे येत नाही का हा कायदा फक्त नाॅन मुस्लिम लोकांसाठी आहे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये काही समजदार लोक सुद्धा पाहायला मिळाले. भिवंडी आणि उस्मानाबाद येथील आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केलं आहे.

दरम्यान,या भयंकर व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक मंदिरांच्या प्रशासनाने स्वतः पुढाकार घेत गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत मात्र दुसऱ्या बाजूला मुंबई पुण्यासह राज्यभरातील अनेक शहरातील मशिदी तसेच दर्गा सुरूच असल्याचे चित्र आहे.