मुंबई – नवरात्रीच्या काळात बांगलादेशमधील मंदिरे आणि देवी-देवतांच्या मूर्तींवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत निषेध नोंदवत हिंदू शिष्टमंडळाने बांगलादेशच्या उच्चायुक्तांची आज भेट घेतली. बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली.
बांगलादेशमध्ये मंदिरावरील हल्ल्याच्या विरोधात, महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराजजी आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील हिंदू शिष्टमंडळाने मुंबईतील बांगलादेश दूतावासात जाऊन बांगलादेश उप उच्चायुक्तांना भेटून निवेदन दिले. त्यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, बांगलादेशमध्ये हल्लेखोरांनी दुर्गा पूजा मंडळावर हल्ला करत देवी-देवतांच्या मूर्तींची नासधूस केली. तोडफोड केली. यामुळे हिंदू समाज अतिशय दुःखी झाला आहे. याला कारण स्थानिक दहशतवादी संघटना आहे. त्यांच्या चिथावणीखोर अफवांमुळे हिंदूंवर आणि मंदिरे, देवी-देवतांच्या मूर्त्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. या घटनांमध्ये वाढ होत आहे, यावर कारवाई करावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली.
महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज म्हणाले की, भारताचे बांगलादेशशी चांगले संबंध आहेत, परंतु हिंदूंचा अशाप्रकारे छळ करणे हे संबंध कायमचे संपवण्यासारखे आहे. भारतातील हिंदू संत हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय पंडित, मुंबई भाजपा सचिव बिमल भूता, मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, मकरंद नार्वेकर इत्यादी उपस्थित होते. याबरोबरच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- जेम्स पॅटिन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली तडकाफडकी निवृत्ती
- देशात आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा होणार पार ; देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<