औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडच्या 10 तरुणी ताब्यात

औरंगाबाद: औरंगाबाद येथील सिडको परिसरातील प्रोझोन मॉलमध्ये दोन स्पामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड टाकत थायलंड येथील 10 तरुणींना ताब्यात घेतले आहे. मॉलमधील स्पामध्ये हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

पोलिस उपायुक्त डॉ.दीपाली घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. फॅमली स्पाच्या नावाने हा प्रकार सुरु होता.