अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्यांचे चरित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदाराने केले आहे. सुरेंद्र सिंह असं त्याचं नाव आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बैरियाचे भाजपा आमदार आहेत. दरम्यान भाजपा आमदाराच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिलांचे चरित्र्य चांगले असते. त्या पैसे घेऊन प्रमाणिकपणे आपले काम करतात. पण अधिकारी पैसे घेऊन काम करतील याची शाश्वती नाही असे मत आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका करण्यात येतीये.