‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’, दरेकरांची अर्थसंकल्पावरून टीका

parvin darekar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’ आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ’ आणि शब्दांचे बुडबुडे तसेच बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे. कारण कोकण, विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे.

कोरोनाचे कारण पुढे करुन मागील योजना पुन्हा मांडल्या. १ रुपयामध्ये पॅथॉलॉजी लॅबची घोषणा किमान समान कार्यक्रमात होती, त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी विचारला आहे. मविआ सरकार स्थापन झाल्यापासून ४५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. त्यावर भाष्य नाही. त्यामुळे हे फसवे धोरण आहे

एकीकडे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला अर्थसंकल्पात पाने पुसली. तर दुसरीकडे शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेसाठी वेगळी तरतूद नाही. त्यासाठी मनरेगामधून खर्च होणार, मराठवाडा वॉटर ग्रीडचा कुठे उल्लेखही नाही. त्यामुळे भ्रमनिरास झाल्याचे दरेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या