हस्तमैथुन : करतात अनेकजण पण बोलायला कोणी तयार नाही

pros and cons of masterbation

टीम महाराष्ट्र देशा: आपल्याकडे काही गोष्टींवर चर्चा करायची म्हटलं तरी अनेकांच्या भुवया उंचावतात, त्यातच लैंगिकतेशी निगडीत काही असेल तर मग कानावर हात येणारचं. पण गेल्या काही दिवसांपासून एक विषय चर्चिला जातोय तो हस्तमैथुनाचा. मागील आठवड्यात ‘विरे दि वेडिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करला वाइब्रेटरचा वापर करत हस्तमैथुन करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.आता हस्तमैथुना सारखा सीन म्हणल्यावर स्वराला ट्रोल करण्यात येणार हे साहजिकच होतंं.

Swara Bhasker masturbation scene veere di wedding
Swara Bhasker masturbation scene veere di wedding

विरे दि वेडिंगनंतर आता स्त्रियांच्या इच्छा, अपेक्षा आणि कामुकतेवर भाष्य करणाऱ्या करण जोहर दिग्दर्शित ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजची चर्चा केली जातेय. यामधील कियारा आडवाणीने केलेल्या हस्तमैथुनाच्या दृश्यावरून वाद निर्माण झाला आहे. विरे दि वेडिंग आणि लस्ट स्टोरीजचे वाद वेगवेगळे असले तरी दोन्हीतील साम्य म्हणजे ‘हस्तमैथुन’.

kiara advani lust stories
kiara advani lust stories
Loading...

मुलगा किंवा मुलगी वयामध्ये येताना शरीरामध्ये अनेक बदल होतात. हे बदल समजून घेणे त्यावर योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेच आहे. मात्र, सभ्य संस्कृतीच्या गोंडस नावाखाली यावर चर्चा टाळली जाते. थोरा-मोठ्यांनी समजवायच्या गोष्टी समवयस्क आणि अर्ध ज्ञानी मित्र-मैत्रीण यांच्याकडून समजावून घ्याव्या लागतात. त्यामुळे साहजिकच तोकड्या ज्ञानामुळे अनेकवेळा चुकीच्या समजुती मनामध्ये तयार होतात. यातूनच अनेकवेळा न्यूनगंड निर्माण होतो. जो मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी अपायकारक ठरतो.

आपल्यामध्ये निर्माण झालेली कामुकता शमवण्याचा एक पर्याय म्हणजे हस्तमैथुन. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतांना देखील सेक्सप्रमाणे हस्तमैथुनवरील चर्चांना सोयीप्रमाणे बगल दिली जाते. त्यामुळे या विषयी अनेक समज – गैरसमज निर्माण झाले आहेत. तुम्ही हस्तमैथुन कधी केले ? हा प्रश्न वयामध्ये आलेल्या मुलांना विचारल्यास अनेक जणांचे उत्तर हे काल, परवा अथवा दोन दिवसांपूर्वी असे हमखास येणार. पण हाच प्रश्न मुलींना विचारल्यास याचे उत्तर मिळणार नाही. कारण मुलांप्रमाणे मुलींनादेखील भावना आहेत आणि त्या हस्तमैथुन करतात, मात्र काही तरी अपराध केल्यासारखं ते लपवलं जात. जागतिक सर्वेक्षणानुसार जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात.

स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. अल्पकाळ का असेना पण यातून आनंद मिळतो. या एवढ्याशा सुखाने देखील आयुष्यात बराच फरक पडत असतो. त्यामुळे स्वाभाविकच स्त्री – पुरुष दोघेही हस्तमैथुन करतात.

man on masterbation

हस्तमैथुनामुळे कमजोरी येते, वीर्य संपून जाते, स्त्रियांमधील प्रजनन क्षमता कमी होते अशा अनेक प्रकारच्या समजुती आहेत. पण पुरुषांच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे इतर घटक तयार होत राहतात त्याचप्रमाणे वीर्य देखील तयार होत राहते. उलट हस्तमैथुन न केल्यास आपल्या ओटीपोटाच्यावर असणारी वार्याची पिशवी भरते त्यामुळे अनेक वेळा आपोआप ‘नाईटफॉल’ म्हणजेच स्वप्नदोष होतो.

हस्तमैथुन किती वेळा करावा याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

लैंगिकतेबद्दल समाजामध्ये असणारे अनेक समज- गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र देशा’ एक सदर सुरु करत आहे. आपणही आपल्या मनामध्ये असणारे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. आपल्या प्रश्नांना तज्ञ मार्गदर्शकांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही करू.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ